मी आज प्रथमच ही चर्चा वाचली आणि मस्त मनोरंजन झाले.

हे सर्व कशासाठी?

ठराविक चर्चेनंतर हा विषय इथे नक्की कशासाठी उपस्थित केला गेला होता असा प्रश्न पडला.

श्री. नितीन यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतु नाही.

पण त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो कि आपल्याला हा मुद्दा उपस्थित करताना हे सर्व प्रश्न अपेक्षित असायला हवे होते आणि उत्तरांची तयारी सुद्धा!

आपण ज्याप्रकारे या सर्व प्रतिक्रियांना उत्तरे दिली आहेत त्यामुळे आपण स्वतःविषयी शंका उपस्थित होण्याला जागा निर्माण करुन दिली आहे.

मी साद देती... वाचले आहे आणि एका योग्याची आत्मकथा वाचणार आहे.

पण म्हणून प्रधानांना आलेले अनुभव मी सांगते म्हणून सर्वांनी खरेच मानावेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल, आणि ते 'धाडस' करणे अनाठायी सुद्धा!! जो पर्यंत अनुभव 'माझा' नाही आणि मी तो सिद्ध हि करु शकत नाही तो पर्यन्त आपण तो चर्चेस ठेऊ नये असे 'माझे' मत आहे. हा विषय स्वतःच्या लिखाणात अनुभव म्हणुन फारतर येऊ शकतो.

आपण मांडलेला कोणताही मुद्दा इतरांनी मान्य करावा असे वाटत असेल तर तो सिद्ध करणे एवढा एकच त्यावरचा जालीम उपाय आहे. अन्यथा सार्वजनिक चर्चेच्या व्यासपिठावर त्याचे असेच व्ह्यायचे! त्याबद्दल प्रश्नकर्त्यांवर तोफा डागणे हा उपाय नाही. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका उपस्थित करणे तर नाहीच नाही.

आपण सदरहु विषयाचा पुन्हा विचार करावा.

अन्यथा आपली इच्छा नसेल तर आपणच उपस्थित केलेला हा विषय ब्लॉक करुन टाकावा.