मराठी बोलतांना कटाक्षाने परकीय शब्द टाळतो, जसे - ऍडमीशन नव्हे प्रवेश.
परभाषिक/परप्रांतीय लोकांशी शक्यतो मराठीतच बोलतो.
पत्रांवर पत्ता नेहमी मराठीत (देवनागरीत) लिहितो.
सर्व प्रकारच्या कागदपत्रांवर मराठीतच स्वाक्षरी करतो.
नातवंडांना मराठी जुन्या कविता, ओव्या, आर्या, फटके म्हणून दाखवतो/शिकवतो
घराच्या दारावर नामफलकही मराठीच आहे.
कौटुंबिक पत्रव्यवहार मराठीतच करतो
शुध्दलेखनाचे नियम कसोशीने पाळतो.
घरांतील सदस्य व मित्रांच्या बोलण्यांत अशुध्द शब्द आले तर त्यांना टोकतो (त्यांच्या शिव्या खातो) जसें 'श्रीमंती पूजन' नव्हे 'सीमांत पूजन', 'कॉरपोरेशन' नव्हे 'महापालिका', 'पेपर' नव्हे 'वर्तमान पत्र'