सर्वप्रथम राष्ट्रध्वजाविषयी जागरुकता हवी. आपल्या राष्ट्रध्वजातला कोणता रंग वर हवा, कोणता रंग खाली, याबद्दलच लोक अनभिज्ञ आहेत, हे मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे. विशेषतः भारतीय संघाच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ध्वज फडकवताना हिरवा रंग वर आणि केशरी सगळ्यात खाली अशा प्रकारे ध्वज फडकावला ज़ात असल्याचे दिसले आहे; आणि ते सुद्धा आपल्याच देशात. अयोग्य पद्धतीने ध्वज फडकावणे, हा सुद्धा त्याचा अपमानच आहे. आपल्याच देशात ज़र हीच स्थिती असेल, तर ध्वजाविषयी जागरुकता असणे/करून देणे महत्त्वाचे. विल्हेवाट वगैरे दूरच्या गोष्टी आहेत.