मला हिंदी भाषेची काही वैशिष्ट्ये जाणवली आहेत. मनांत कपट बाळगून तोंडदेखले चांगले बोलायला, गोड बोलून फसवायला व खोट्या बढाया मारायला हिंदी भाषा अत्यंत उपयुक्त आहे. त्याबाबतींत मराठी भाषा अगदीच कुचकामी आहे. गरज नसतांनाही नकळत सर्रास हिंदीचा वापर करणाऱ्या मराठी माणसांची विश्वासार्हता शंकास्पद असावी असा माझा अंदाज आहे. ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून तपासून पहावी. काहीतरी उपयुक्त माहिती नक्कीच मिळेल.