सर्वसाक्षी,
            'ढालगज भवानी' हा वाक्प्रचार पेशवाईत निर्माण झाला.  ढालगज भवानीची मी वाचलेली आणखीन एक व्युत्पत्ति अशी आहे की ढाल म्हणजे मोठे निशाण‌. सैन्यात ते निशाण मोठ्या थोरल्या काठीला बांधून ही ढालकाठी हत्तीवर चढवत. ध्वज सर्व सैन्याला दिसला पाहिजे म्हणून त्याची अशी उंच गजस्कंधी स्थापना करणं गरजेचं असे.  पेशव्यांच्या ज्या हत्तिणीवर हे निशाण चढवण्यात येत असे तिचं नाव भवानी असं होतं. म्हणून हा वाक्प्रचार.
                                                                        वैशाली सामंत.