टिळक-आगरकर आपापल्या परीने दोघेही मोठे होते, परंतु वेगवेगळ्या विचारसरणींनी आज त्या दोघांच्या नावांना आपल्या दावणीला बांधून जो हैदोस घालण्याचा सपाटा लावला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे.

टिळकांबद्दल (विशेषतः त्यांच्या १५० व्या जयंतीबद्द) लिहिताना टिळक-आगरकर हा वादच सर्वत्र उठून दिसतोय या बाबत सहमत.

सव्वाशे वर्षांपूर्वी टिळक चुकले की आगरकर हा विषय आता चावून चावून चोथा झालाय. त्यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही, केवळ चर्चेचा वाद आणि वादाचे भांडण होईल!

हे मात्र कुठल्याही व्यक्तिंबद्दल होत. फक्त टिळक आगरकरच नाही. आपला मराठी बाणा म्हणा फार तर (ह. घ्या)

----

नामदेवपंत,

आपला लेख आवडला. अभ्यासपूर्ण वाटला. माझ्या पदरचे कुठलेही अनुभव नसल्याने आपल्या लिखाणाला शुभेच्छा देऊन थांबते.

प्रियाली.