नमस्कार विनायक,
चूक दुरुस्ती बद्दल धन्यवाद. मी पूर्णपणे माझ्या आठवणीतून लिहिल्यामुळे असे घडले.
आपण त्यांचा बरोबर गूण सांगितला की त्यांना समोरच्याचे गूण ओळखता येत. तसेच त्यांनी त्यांचे वाद हे तत्त्वांपुरतेच मर्यादित ठेवले. व्यक्तिगत पातळीवर आणले नाहीत. त्यांच्या आणि गोपाळ गणेश आगरकरांच्या वादात श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी आपण फार लहान आहोत. दोघांचीही त्या वेळेस गरज होती आणि आताही तितकीच आहे.
आगरकर शेवटचे क्षण मोजताहेत हे कळल्यावर टिळक त्यांचे टोकाला गेलेले भांडण विसरून भेटायला गेले. आगरकरांना राग असल्यामुळे ते टिळकांशी बोलले नाहीत (यात मी आगरकरांना कमी लेखतोय असे समजू नका). त्यांचा आगरकरांवरचा म्रुत्यूलेख हा वाड्गमयीन मूल्याचा एक नमुना आहे. असे म्हणतात की अश्रूंच्या धारा वाहतं ठेवून (भावना न लपवता) त्यांनी तो लिहिला.
टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे भांडण (जहाल-मवाळ) हे प्रसिद्ध आहेच. त्यामुळे पहिल्यांदा (आणि तत्त्वासाठी म्हणून कदाचित शेवटची) काँग्रेस फुटली. पण हेच गोखले गेल्यावर काही महाभाग अनुयायांनी विचारले की अंत्ययात्रेचे काय करायचे? टिळक वैतागून म्हणाले मला त्यांचे दर्शन घेयचे आहे, तुमचे तुम्ही ठरवा.
पुण्याच्या आर्यन सिनेमात एकदा टिळकांना बोलावून त्यात एक चित्रफीत दाखवली की ज्यात सर्व मोठ्या (हयात असलेल्या/नसलेल्या) पुढाय्रांच्या भूमिका करून (चांगल्या अर्थाने) नक्कल केली होती. टिळकांना अभिप्राय विचारल्यावर ते म्हणाले की छान आहे, पण आमचे गोपाळराव दिसले नाहीत.. तर कुणीतरी म्हणाले की "आहेत की (गोपाळ कृष्ण) गोखले". त्यावर टिळक उत्तरले मी आगरकरांबद्दल बोलतो आहे...