तुषारशी सहमत, त्याने अगदी समर्पक भावार्थ दिला आहे, पण मला ह्यातुन अजुन एक भावार्थ जाणवला; तो म्हणजे जीवनाला असलेल्या दोन बाजु ,ह्या एकमेकांच्या सोबतीने नांदतात.‌; जसे शुभ आणि अशुभ, चांगले आणि वाईट, मंगल आणि अमंगल, . एकमेकांच्या आजुबाजुलाच नांदत असतात, पण आपल्याला त्याची खबर सुद्धा नसते...एका घरात शहनाई तर दुसऱ्या घरात रुदन, ..एका घरात जल्लोष तर दुसऱ्या घरात विलाप,.. एका घरात मिलन तर दुसऱ्या घरात वियोग असे आपण अनेकदा बघतो.‍ जीवनाचे हे रुप  ही कविता अजिबात आडवळणे न घेता, आपल्यापुढे मांडते; मन चर्ऱ करणाऱ्या विरोधाभासी प्रसंग, परिस्थीतीचे दाखले देत! ह्या कवितेला, प्रस्थापीत गोंडस कलात्मक अभिव्यक्तीचा चेहरा नसेलही, पण ती कवियत्रीला अपेक्षीत असलेला परिणाम साधते, हे मात्र नक्की.

-मानस६