मंडळी..
मनोगतासाठी वर्गणी असावी किंवा आपण आपापल्या कुवतीप्रमाणे हातभार लावणे यावर माझे दुमत नाही.

मात्र एक पर्याय आहे .. गूगल एड्सेंस ..

तर, मी म्हणतो, मनोगतावर, जिथे काही रिकामी जागा दिसते त्या ठीकाणी त्या-त्या मापाच्या जाहिराती दाखवणे. या जाहिराती विषयानुरुप असतात.. शिवाय गूगल कडून असल्यामुळे शंकेस वाव नसावा!

आणी, गूगल या जाहिराती दाखवणे आणी त्या संकेतस्थळांना भेट देणे यासाठी रुपये देते..

जर प्रत्येक मनोगतीने रोज एक याप्रमाणे या जाहिरातींना भेट देवून हातभार लावायचा ठरवले तरी सुध्दा .. मंडळी .. मनोगत दरमहा किमान दहा हजार रुपये तर अगदी साहज जमवू शकते.. शिवाय जेवढ्या या जाहिरातींना भेटी दिल्या जातील तेवढे रुपये जास्त.

मी माझ्या मित्राचा गूगले ने पाठविलेला रु. ५९६०/ चा चेक [माफ़ी - मराठी शब्द सापडला नाही..] पाहीला आहे.. अर्थात, जेव्हा तुमच्या गूगल खात्यामध्ये - १०० अमे. डौलर जमा होतात, त्याच्या पुढीलमहिन्यात ते आपल्या नावे आपल्या घरी पाठवतात..!

मात्र  अधिक प्रेमापोठी म्हणा किंवा खोड्साळ्पणा म्हणून म्हणा.. एकाच संगणकावरूनजर शंकास्पद भेटी - [more clicks and more visits to the advertised sites] होत असतीलतर गूगल हे खाते रदद सुद्दा करते..

तर .. सांगायचा मुद्दा असा की.. हा - गूगल एड्सेंस नावाचा पर्याय आपणास कसा वाटतो.

आभार,
सर्जा