द्वारकानाथजी, आपल्या काम करन्याच्या इछा खरंच स्तुथ्य आहे. मराठी शाळा खरच एका आवघड परिस्तीतुन चालल्या आहेत. माझ्या मते आपण सर्वांन्नी आपल्याला जमेल तसे मराठी वाचवन्यासाठी प्रयन्त केले पहिजेत. माझे मराठी बद्दल प्रयन्त थोडक्यात लिहित आहे.
मी इथे थायलंड मधे २ वर्षापुर्वी आलो. इथे भाषेचा फार मोठा प्रश्न आहे. यांना इंग्रजी आजिबात येत नाही ना त्यांन्ना आपल्या येवढे इंग्रजी प्रेम आहे. पहिल्यांदा फार आडचनी आल्या विशेषतः ड्रायवर (चालक, नाव - प्रिचा) बरोबर संवाद करताना मला खुप कष्ट होत आसंत, कारण त्याला इंग्रजी येत नव्हते, आणि मला थाय येत नव्हते. मी त्याच्याशी सांकेतीक भाषेत बोलत आसे, आणि दुरध्वनी वर थोडे थोडे शब्द बोलुन आम्ही काम चालवत आसे. उदा. - 'आता मला घ्यायला कार्यालयाकडे ये' ला 'प्रिचा, ऑफिस, नाव'.
मग मी त्याला इग्रजी शिकवन्यापेक्षा मराठी शिकवन्याचे ठरवले त्या बदल्यात तो मला थाय शब्द सांगत आसे. पण मराठी शिकवने किति आवघड आसते ते मला समजले आहे. आगदी लहान मुलांना आभीनय करुन शिकवतात तसं मला त्याला शिकवावे लागले. माझी पत्नी याबद्दल नेहमीच मला हासत आसे. आमचे 'मराठी' व 'थाय' देवान घेवान होऊ लागली. सुरवातीला 'डावीकडे' (लिवो साय), उजविकडे (लिओ कुवा), नमस्कार ( स्वास्दी था / खाप ), धन्यवाद (खाप्खुन खा / खाप) आश्या सोप्या शब्दांमधे आम्हाला खुप त्रास झाला. पण दोघांच्या चिकाटीने / गरजेमुळे आम्ही आतः बरी मराठी / थाय बोलतो. त्याची प्रगती खरंच छान आहे की, दुरध्वनी वर त्याला 'प्रिचा घराकडे ये' सांगितल्यावर तो 'आत: का?' आसं विचारतो.
गम्मत म्हणजे मॉरीशस हुन माझा मराठी बोलनारा एक कर्यालयीन सहकारी आला होता. त्याच्याशी प्रिचा तोडक्या मराठी मधे बोलला तेव्हा त्यालाही आच्छर्य वाटले होते.