आधीच एकी नसलेल्या मराठी समाजात जोमाने दुही माजवत ठेवण्याचा प्रयत्न म्हणून या संकेतस्थळाचा उल्लेख करावा लागेल. आपण मराठी लोकं असेच एकमेकात भांडत राहणार आणि परप्रांतीय आपल्यावर सुखेनैव राज्य करणार! बिहारी, उत्तर भारतीय लोकांपुढे आधीच आपण नांगी टाकतो; असल्या दुभंगलेल्या, स्वार्थी मराठी जनतेला गुलाम बनवायला त्यांना कितीसा वेळ लागणार? पुरुषोत्तम खेडेकरांच्या पुस्तकांची नावे बघा. हसू येते. धन्य तो महाराष्ट्र!