मित्रहो,
संभाजी ब्रिगेडच्या दादागिरीचा नमुना सांगतो. काही दिवसांपूर्वी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर संभाजी ब्रिगेडच्या माथेफिरू सदस्यांची वक्रदृष्टी पडली. त्यांचा काहीही दोष नसतांना हे संभाजी ब्रिगेडचे स्वयंघोषित समाज सुधारक (थोडक्यात गुंड आणि मवाली!) त्यांच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांना वाट्टेल त्या शिव्या दिल्या आणि धमकी देऊन त्यांना धक्काबुक्की केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळे वीर त्यांचेच कधीकाळी विद्यार्थी होते! ३०-४० च्या संख्येने आई-बहिणीवरून शिव्या देत आणि दात-ओठ खात आणि कदाचित काही दारु पिऊन जर एखाद्या पोक्त वयाच्या पापभिरू शिक्षकाच्या खोलीत घुसले तर त्या शिक्षकाची काय अवस्था होईल? अशा तऱ्हेने समाज सुधारणा घडवून आणायची फार नामी पद्धत शोधून काढली आहे या संभाजी ब्रिगेडने! बिहारी आणि उत्तर भारतीयांच्या मुजोरीला मात्र यांच्याकडे काही उपाय नाही. त्यांचा समोर हे शेपूट घालून पसार! आपल्यातच दुही माजवून अखिल मराठी समाजाची ताकत कमी करण्यात त्या मूर्ख पुरुषोत्तम खेडेकरला काय आसूरी आनंद मिळतो, देव जाणे! त्याच्या असल्या भ्याड आणि समाजविघातक प्रयत्नांमुळे काही फरक पडत नाही हा मुद्दा अलाहिदा! राजकीय स्वार्थ काही साधला जात असेल तर माहित नाही! संभाजी ब्रिगेड मात्र गुंडगिरीच्या मार्गाने मराठी समाजाला आपसी कलहाची कीड लावणाऱ्या माकडांची संघटना आहे हे मात्र खरे! सिमी सारखी याही संघटनेवर बंदी यावयास हवी. कुठलीही वैचारिक बैठक नसलेल्या आणि नुसती मारझोड करून, शिवीगाळ करून शक्तीच्या जोरावर वातावरण दूषित करणाऱ्या संघटनेला अर्थ तो काय?