प्रतिसाद लिहिणे आणि बदलणे ह्याविषयी काही प्रयोग चालू असल्याने प्रशासनाची प्रतिसादाची व्यवस्था सध्या बंद आहे. प्रतिसाद देताना सर्व प्रयोग तेवढ्यापुरते थांबवून ती सुरू करावी लागते, ही तांत्रिक अडचण आहे.
शिवाय चर्चेत प्रशासनाने मध्येच टिप्पणी करण्याने सदस्यांच्या ह्या संबंधातील विचारांवर काही अधिकउणा परिणाम होऊ नये हा उद्देश ठेवला होता. ह्या दोहोंमुळे उत्तरासाठी विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व.
मराठी भाषेसाठी काही करावे असे मनात येऊन साहाय्यासाठी अनेकानेक जणांचे हात उत्स्फूर्तपणे पुढे यावे ही अतिशय हुरूप वाढवणारी गोष्ट आहे. सध्या जरी प्रशासनाचा असा काही बेत नसला तरी चांगल्या कार्यात भाग घ्यायची पुष्कळजणांची इच्छा असते, हे लक्षात घेऊन अधिकाधिकजणांना अधिक सुलभतेने हातभार लावता यावा, आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही ते सोयीस्कर पडावे असे पाहून भविष्यात अशी काही योजना करून सर्वांना तीत भाग घेण्याविषयी आवाहन करण्यात येईल.
सर्वांच्या सहभागाबद्दल धन्यवाद.