नमस्कार,
रिकामा न्हावी (भिंतीला)/कुडाला तुंबड्या लावी
या म्हणीची अर्थ शाळेत आमच्या एका गुरुजींनी पुढील प्रमाणे सांगीतला होता.
पूर्वी कावीळ आणि तत्सम रक्त दूषित करणाऱ्या रोगांवर इलाज म्हणून ढेकूण ठरावीक ठिकाणी रुग्णाच्या अंगावर सोडून त्यांकरवी दूषित रक्त काढून टाकण्याचा उपाय योजत असत. त्या कामी ढेकणांना पकडून त्यांना साठवून ठेवण्यासाठी 'तुंबडी' या साधनाचा उपयोग करीत. या तुंबड्या म्हणजे लाकडाच्या तुकड्याला लहान लहान भोके पाडलेली असतात. त्यात ढेकूण सुरक्षित राहतात. तर. हे काम न्हावी करत असत. त्यामुळे केशकर्तनाचे काम नाही, कोणी रूग्णही नाहीत तर काय करावे? भिंतीलाच तुंबड्या लावत बसा!
काही वेळा या तुंबड्या म्हणजे जळवा तर नाहीत ना अशी मला शंका येते.
माझ्या माहितीमध्ये चूक असल्यास दोष माझ्या स्मरणशक्तीचा आहे.
आपला लिखाळ.