आश्चर्य म्हणजे अपवाद म्हणूनही एकही प्रतिसाद logic सोडून, केवळ पूर्वग्रहदूषित तर्क/हेतू मनात धरून लिहिलेला आढळला नाही.

एक खुलासा आधी करतो. इथे  "सप्टेंबर = सप्तांबर = सातवे अंबर",  "येशू ख्रिस्त म्हणे मूळ भारतीय होता व त्याचे नाव विष्णु-कृष्ण वरून आलेले आहे", "मिस्टर हा शब्द महास्तर वरून आला आहे" इ. विधानांना मी एकत्रितपणे षटकार असे म्हणतो आहे. अर्थातच त्यामुळे हे विधान वैयक्तिक आपणास उद्देशून नव्हते. पण तसे स्पष्ट लिहिले नाही ही माझी चूक इथे मान्य करतो.

परंतु आपण ज्याला तर्क वा logic म्हणता ते मात्र मला मान्य नाही. अहो तर्काला वा लॉजिकला काही आधार नको का? नाहीतर जॉन हा मूळचा ज्ञाना वरून आला म्हणजेच ज्ञानेश्वर वरून आला असेही म्हणता येईल. अशा प्रकारच्या संशोधनाला प्रचंड पूर्वतयारी लागते ती ओक-वर्तक किंवा तत्सम मंडळींकडे नसते. नुसती शाब्दिक कसरत ही पुरेशी नसते. (इथे ओक-वर्तक यांचा उल्लेख त्याप्रकारच्या मानसिकतेचे प्रातिनिधिक रूप म्हणून केला आहे)

तसेच आपण वा अन्य कोणी हे लिखाण पूर्वग्रहदूषित मनाने केले आहे असे मी म्हटलेले नाही. माझे विधान एखादा मुद्दा आपल्या सोयीचा आहे वा खरा असावा असे वाटते याचा अर्थ तसा नाही हे स्पष्ट करतो. सोयीचा याअर्थी की ज्यामुळे आपला देश, संस्कृती, वा अन्य काही परंपरा ह्या श्रेष्ठ ठरतात त्यामुळे आपला स्वाभिमान म्हणा - वा अहंकार म्हणा - सुखावतो. अर्थात त्यासाठी तुम्ही वा मी हेतुतः काहीच करत नसतो वा काही सिद्ध करत नसतो, आपण फक्त हे समज अधिक प्रवाही करत असतो. आणि असलाच तर तेव्हढा दोष आपला, कारण मग आजचे मोकाट तर्क उद्याची गृहितके होतात.

असो.

-विचक्षण