त्या कामी ढेकणांना पकडून त्यांना साठवून ठेवण्यासाठी 'तुंबडी' या साधनाचा उपयोग करीत. या तुंबड्या म्हणजे लाकडाच्या तुकड्याला लहान लहान भोके पाडलेली असतात. त्यात ढेकूण सुरक्षित राहतात.

या उपकरणाला ढेकणी म्हणतात असे वाटते. पूर्वीच्या काळी अश्या अनेक ढेकण्या बिछान्याभोवती लावून झोपायचे. रात्री ढेकूण आपल्या बिळा-भोकातून बाहेर येतात, बिछान्यात घुसत. सकाळ जेंव्हा होते, तेंव्हा ते भिंतीकडे परत जायला निघत. पण वाटेतल्या ढेकण्यातली भोकांत घुसत आणि तिथेच राहात. मग दुपारी, भर उन्हात या ढेकण्या घेऊन अंगणात यायचे. एखाद्या दगडावर या ढेकण्या एक एक करून आपटायच्या. भोकांत लपून बसलेले ढेकूण बाहेर पडत. त्यांना पायाने चिरडून मारायचे. जे निसटतील ते उन्हात भाजून मरून जात.