पूर्वी न्हाव्यांचे मुख्य काम वस्तऱ्याने डोक्यावरचे केस काढण्याचे असे. (कात्रीने करायच्या स्टायली नंतर आल्या असाव्यात.) वस्तऱ्याने डोक्यावरचे केस काढताना जखमा होणे आलेच. पावसाळ्याच्या दिवसात न्हाव्यांचा धंदा मंदीचा असे कारण डोक्यावरच्या जखमा चिघळायची शक्यता असे.
पावसाळ्याच्या दिवसात वस्तऱ्याने डोके भादरायच्या सराव जाऊ नये म्हणून न्हावी लोक भिंतीला (वाळके? दुधी?) भोपळे टांगून त्यावर सराव करायचे. याला तुंबडी लावणे म्हणत. म्हणून रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
...८-१० वर्षांपूर्वी सकाळमध्ये वाचलेल्या एका लेखमालेवरून.