श्री. विनायक,

आपल्या आधी समाजसुधारणा केली असती तर आज स्वातंत्र्य मिळाले असते का? या विधानाविषयी जरा वेगळे मत नोंदवावे वाटते. ते असे की भारताला मिळालेले स्वातंत्र्य केवळ भारतीय ( रक्तरंजित क्रांतिमार्गे वा अहिंसात्मक मार्गाने) स्वातंत्र्य चळवळीमुळे मिळाले असे मानणे एकांगी ठरेल. कारण (दुसऱ्या महायुद्धात जिंकूनही उद्ध्वस्त झालेल्या) ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकांनी केलेले सत्तांतर हे एक कारण आहे. मजूर पक्षाने सत्ता मिळाल्यास वसाहतींना स्वातंत्र्य देण्याची भाषा आपल्या जाहिरनाम्यात केली होती. योगायोगाने त्यांना सत्ता मिळाली. त्यांच्या जाहिरनाम्यानुसार त्यांनी भारताप्रमाणेच श्रीलंका(१९४८),ब्रम्हदेश (१९४६) इ.इ. अनेक वसाहतींना स्वातंत्र्य दिले. याचाच अर्थ दुसऱ्या महायुद्धालाही भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय जाते. असो. बाकी आपल्या विधानांशी सहमत होता येईल.

अवधूत.