बाबासाहेब पुरंद-यांनी 'ढालगजभवानी' ची व्युत्पत्ती एका व्याख्यानात सांगितली होती.
ढालगज चा वर दिलेला अर्थ बरोबर आहे. तो झेंड्याचा हत्ती म्हणूनपण ओळ्खला जातो.
पेशव्यांकडे (बहुतेक थोरले माधवराव) 'भवानी' नावाची झेंड्याची हत्तीण होती. तिच्यामुळे 'ढालगजभवानी' असा वाक्प्रचार रूढ झाला असावा.