आत्ता जर्मनी मध्ये पार पडलेल्या विश्वचषक सामन्यां दरम्यान वातावरण एकदमच भारलेले होते. तेंव्हा लोक आपल्या गाड्यांवर, घरासमोर मोठा ध्वजस्तंभ उभारून, डोक्यावरील टोपीवर लहान झेंडा चिकटवून तर कधी चेहऱ्यावर (गालावर) लहान आकाराचा झेंडा रंगवून आपला उत्साह, आनंद आणि देशप्रेम व्यक्त करीत होते. मग त्यातच रस्त्यावर फिरताना मोठा ध्वज अंगावर पांघरून, केस त्या प्रकारचे रंगवून फिरणारे चित्रविचित्र लोकही होते.
या मध्ये देशावरचे प्रेम आणि उत्साह या दोहोंचाही नक्कीच समावेश असणार.

आपल्याकडे मात्र कोठल्याही प्रकारच्या प्रदर्शनाविषयी उदासीनता जाणवते. येथील कित्येक घरात त्यावेळी ध्वज दिसेल.
 पण आपल्याकडे मात्र ध्वजासंबंधी सर्वच बाबतीत अत्यंत उदासीनता दिसते. मग तो मिरवणे असो अथवा त्याचा मान राखणे असो.

 आपल्याकडे तर बरेचदा विद्यार्थ्यांच्या टोपीवर अथवा पाठीवरच्या दप्तरावर अमेरिकेचा नाहीतर इंग्लंडचा झेंडा आढळेल.

आपला,
--लिखाळ.