प्रियालीताई,
अमेरिकाच नव्हे तर समुद्रप्रवास केले तर धर्मबहिष्कार होत असे हे सत्य आहे. कित्येक गोष्टी केल्या तर त्यांना धर्मबाह्य करावे असे कर्मठ सनातनी (बहुषः ब्राह्मण) जनतेवर लादायचे.
लो. टिळकांना अशाच फालतू कारणासाठी शुद्धी करून घ्यावी लागली. अर्थात स्वतः टिळकांना ते मान्य नव्हते. त्यांनी केवळ समाज/राजकारणामध्ये अडथळा नको म्हणून त्यांनी शुद्धी करून घेण्यास मान्यता दिली.
तेव्हा आपल्याला ज्या दाक्षिणात्य गृहस्थाने सांगितले ते फारसे वावगे नसेल असेच वाटते.
कलोअ,
सुभाष