विचक्षण - खुलाश्याबद्दल धन्यवाद!

एक खुलासा आधी करतो. इथे  "सप्टेंबर = सप्तांबर = सातवे अंबर",  "येशू ख्रिस्त म्हणे मूळ भारतीय होता व त्याचे नाव विष्णु-कृष्ण वरून आलेले आहे", "मिस्टर हा शब्द महास्तर वरून आला आहे" इ. विधानांना मी एकत्रितपणे षटकार असे म्हणतो आहे. अर्थातच त्यामुळे हे विधान वैयक्तिक आपणास उद्देशून नव्हते. पण तसे स्पष्ट लिहिले नाही ही माझी चूक इथे मान्य करतो.

परंतु आपण ज्याला तर्क वा logic म्हणता ते मात्र मला मान्य नाही. अहो तर्काला वा लॉजिकला काही आधार नको का?

तसेच बटाट्याच्या प्रतिसादाबद्दलही!!
आपण ज्यांना "षटकार" म्हणता आहात तेही बटाट्यांच्या प्रतिसादाप्रमाणेच दिगम्भांनी उपहासात्मकच लिहिले आहेत... असे मला वाटते... म्हणजे आपण सगळे एकच बोलतो आहोत असे वाटते. (नसल्यास दिगम्भांनी सांगावे!)
अंबर यात शद्बखेळ आहेच (ज्याला आधार सापडलेला नाहीच! पण जाणकारांसमोर प्रश्न केवळ कुतुहलापोटी!!)... पण पेक्षाही महिन्यांच्या व्याखेशीही थोडाफार संबंध आहे म्हणून त्यात तथ्य नसले तरीही मांडणी आवडली एवढाच भाव आहे. जॉन आणि ज्ञाना आवडले!!

माझे विधान एखादा मुद्दा आपल्या सोयीचा आहे वा खरा असावा असे वाटते याचा अर्थ तसा नाही हे स्पष्ट करतो. सोयीचा याअर्थी की ज्यामुळे आपला देश, संस्कृती, वा अन्य काही परंपरा ह्या श्रेष्ठ ठरतात त्यामुळे आपला स्वाभिमान म्हणा - वा अहंकार म्हणा - सुखावतो. अर्थात त्यासाठी तुम्ही वा मी हेतुतः काहीच करत नसतो वा काही सिद्ध करत नसतो, आपण फक्त हे समज अधिक प्रवाही करत असतो. आणि असलाच तर तेव्हढा दोष आपला, कारण मग आजचे मोकाट तर्क उद्याची गृहितके होतात.

सहमत!
अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घ्यावयास हवी याबद्दल संपूर्ण सहमती!!