पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न.

ज्या किल्ल्याला वेढा घातला आहे त्यातल्या सैन्याने सर्वशक्तीनिशी वेढ्यावर निकराचा हल्ला करणे म्हणजेसुद्धा सुलतानढवा का? बाबासाहेब पुरंदऱ्यांनी पुरंदरच्या तहाच्या व्याख्यानात मुरारबाजीने किल्ल्यातून बाहेर पडून वेढ्यावर सुलतानढवा केला असे सांगितल्याचे आठवते.