आऱकॉलेजमध्ये असताना, मी आणि माझ्या एका मित्राने, OARS ( ऑरनायझेशन अगेन्स्ट रिपब्लिकन स्लेवरी ) नावाची पार्टी काढायचे भतलेच मनावर घेतले होते. बहुतेक सर्वांनकडून शक्यतितके खच्चीकरण झाले. कोणी हसले तर कोणी आपल्या हातात काही नाही, आपण काहीही करू शकणार नाही चे यथेच्छ डोस दिलेत आणि काही महिन्यातच काहीही कार्य न करता ORSE बंद पडली. आणि मित्र दुबईला स्थायिक झाला. असो.
मी शक्य तितक्यावेळा मतदान केले आहे. पालिकेच्या निवडणूकीत स्थानिक प्रश्न, विधानसभेच्या निवडणूकीत राज्याचे आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी देशासमोरील प्रश्न पाहून मतदान करायची इच्छा असते. पण बहुतेकवेळा, मुंबईत येऊन, चौबे, दुबे, यादव, शहा अगरवाल, ह्यांनी पैसे खाण्यापेक्षा सावंत, राणे ह्यांना ती संधी मिळावी म्हणून मी मराठी उमेदवारालाच मत टाकतो. तो किती नालायक आहे आणी त्याने आपल्यासाठी काहीही केले नाही आणि तो करणारही नाहीये हे माहीत असून.
आता नवीनच एका पार्टीचे सदस्यत्व घेतले. पण "थोडा थांबा, सगळ्यांना मिळेल" असं काहीतरी कानवर आले, आणि पुन्हा निराशा ...
मयुरेश वैद्य.