मला सनावळ्या महत्त्वाच्या वाटतात. अमुक एक घटना एका जागी घडली तेव्हा अन्य भागात काय घडत होते ह्याविषयी मला उत्सुकता असते.
   उदा. शहाजहान आजारी पडल्यामुळे औरंगजेबाला घाईघाईने दक्खन सोडून दिल्लीला जावे लागले आणि त्यामुळे शिवाजीने काही गोष्टी चतुराईने पदरात पाडल्या असे वाचले.
   ऐतिहासिक घटना कालाच्या चौकटीत बसवत्या आल्या तर बिग पिक्चर (अचूक मराठी प्रतिशब्द माहीत नाही) दिसायला मदत होते असा माझा अनुभव आहे.
   ज्यांची तशी कुवत नसेल त्यांनी सनावळ्यांच्या गुंतवळ्यात आजिबात अडकू नये. माझी कुवत आहे आणि मी नेहमीच ती माहिती घेणार.
 अनाहूत सल्ला दिल्याबद्दल आभारी आहे पण मला तो आजिबात पटला नाही.