आपण निवडून दिलेल्या नेत्याने अपेक्षेप्रमाणे काम न केल्यास त्याला सभागृहातून परत बोलवण्याचा अधिकार असावा. आजमितीच्या नियमांप्रमाणे एकदा निवडून आल्यावर (मृत्यूखेरीज) पुढच्या पाच वर्षांची निश्चिंती असते असे वाटते. मतदारांना निवडून दिलेल्या नेत्याला परत बोलावण्याचा अधिकार मिळाला तर ही निश्चिंती कमी होऊन लोकनेते कामे करतील असे वाटते.