बिपिन यांनी या चर्चेच पुनरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद. फ़ार काही स्पष्ट आठवत नसल्याच दुःख आहे. तरी...
दूसरी की तिसरीत, गाय आणि पाडसाचा वात्सल्य नावाचा धडा, चिमण्यांबद्द्लचा धडा, एक आबा नावाच्या घरात खड्डा करून पैसे साठविणारा, खिचडी करून खाणाऱ्या विक्रेत्याचा धडा आठवतो. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा मराठी बद्दलचा, पूर्णपात्र्यांच्या सोनाली नावाच्या पाळीव सिंहींणीचा, चिं. वि. जोशींचा ५०० रूपये वाल्या गाडीचा, आंबेडकरांच्या चवदार तळ्यावरिल सत्याग्रहाच्या भाषणाचा, गाडगेबाबांचा धडा, कोकणातले दिवस, बखरीतला उतारा आठवतो.
'श्री चामुंडाराये करवियले' असा बाहूबलीच्या धड्यातला श्रवणबेळगोळ मधील पहील मराठी वाक्य अंधूक आठवत.
झूले बाई झूला, मन वढाय वढाय, हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, हे ऱाष्ट्र देवतांचे, हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे, किनारा तुला पामराला, माझे गाणे-जीवन गाणे या कविता. ज्ञानेश्वरपूर्व काळच्या श्रीधर नावाच्या कवीची एक कविता होती पण ती आजीबात आठवत नाही. दलित वाङमयातला सुद्धा काही आठवत नाही.
व्याकरणातील सांबाच्या पिंडीते बसशी वृश्चिका खेटून आज, परि तो आश्रय सुटता खेटर उतरिल रे तुझा माज, म स ज स त त ग, मंदारमाला, शार्दूलविक्रिडीत, नववधू प्रिया मी वैगेरे काय काय आठवतं.
आत्ताच्या मराठीच्या पुस्तकांत काय आहे या बद्दल कुतुहल आहे.