कृपया हा प्रश्न कुणाचा उपमर्द करण्याच्या हेतूने नाही केवळ कुतुहलापोटी.

शहाजी राजांची महाराष्ट्रातील जहागिर किती आणि कुठे होती याबाबत कुणाला माहिती आहे का? आपल्या लहान मुलाला व बायकोला त्यांनी पुण्याची जहागिर का देऊ केली? शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी पुणे हे मध्यवर्ती होते किंवा राजकिय दृष्ट्या महत्वाचे होते का?

शिवाजी व जिजाबाई प्रथम पुण्याला आले असता पुण्याची दूरावस्था होती. शेतकरी सोडून गेले होते. जिजाबाईंनी सोन्याचा नांगर करून जमीन नांगरली. तसेच लांडगे व इतर श्वापदे मारणाऱ्याला बक्षिस जाहिर केले. त्यावरून हया भागाची परिस्थिती वाईट होती असे लक्षात येते. शहाजी राजांनी आपली विश्वासू माणसे सोबत पाठवल्याने यात त्यांना ह्या परिसराचे पुनर्वसन हवे होते असे वाटते.

कुणी तज्ज्ञ शिवपूर्व कालातील पुण्याच्या महत्वावर प्रकाश पाडू शकेल काय?

(विनायक दादांना यातील माहिती असल्याने त्यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहिला आहे तरी इतरांनीही शक्य असल्यास उत्तर द्यावे)