फार त्रोटक वाटतात. पण वाचायला आवडतील.

राजनीति, धर्मशास्त्र वगैरे शिकल्याशिवाय ब्रम्हास्त्रासारखी महाभयानक शस्त्रांचे ज्ञान घेणे धोकादायक ठरेल म्हणून त्याने शिकार करण्यासाठी आवश्यक इतपत साधीसोपी धनुर्विद्याच शिकावी असा उपदेश गुरु द्रोणाचार्य यांनी कदाचित केला असेल.

हे ठीक आहे. पटण्याजोगे कारण कुठली विद्या कोणी आणि कधी शिकावी हे ठरलेले आणि ठरवून दिलेले असावे.

बाये हाथका खेल, हातचा मळ याप्रमाणेच अंगठ्याविना शरसंधान असा एखादा वाक्प्रचार त्या काळी कदाचित प्रचलित असेल.

पटले नाही. एकंदरीत तत्कालीन समाजाची रचना आणि समज पाहता अंगठा कापून मागणे फार मोठी गोष्ट असेल असे वाटत नाही.