अनु,
माझ्या नवऱ्याला हा आजार आहे, आणि अगदी विकोपाला गेलेला आहे. कपड्यांची कपाटं, स्वयंपाकघर, टेबल, कुठलं कुठलं क्षेत्र त्याला वर्ज्य नाही. मी आणि चिरंजीव तुझ्या पतीदेवांच्या लायनीतले. त्यामुळे त्याला जरा रिकामा वेळ असला की 'आज बाबा काय उपसणार?' म्हणून आम्ही चिंतीत असतो.
जाड पोहे-पातळ पोहे एकत्र करुन ठेवणे, (खुळचटासारखे दोन दोन बरण्यात पोहे ठेवायचं काय कारण?-) वेगवेगळ्या प्रकारच्या तिखटांमध्ये केला जाणारा भेदभाव त्याला अजिबात सहन होत नाही-म्हणजे कांदालसूण मसाला, साधं तिखट, सासूबाईंनी घरी केलेलं मसाल्याचं तिखट हे सगळं तो एकत्र करुन ठेवतो. (चार बरण्यांमध्ये तिखट ठेवण्यापेक्षा एकत्र ठेवलं की बाकीच्या स्वच्छ करता येतात! पण इच्छा पाहिजे ना स्वच्छ करायची!) एकदा तर तिखट, गोडा मसाला, एवरेस्ट चे काही मसाले असं सगळं एकत्र करुन जास्तीत जास्त बरण्या रिकाम्या करुन तो समाधान पावला होता. वापरातल्या वस्तू (पसारा होतो म्हणून माळ्यावर टाकणे ) काय काय सांगू?
स्वयंपाकघरातल्या कपाटाच्या दारावर मी शेवटी परमनंट मार्करने लिहून ठेवले आहे, की बरण्यांधील तिखटे दिसायला सारखी दिसली तरी कृपया एकत्र करुन ठेवू नयेत. पण असं काय काय आणि कुठं कुठं लिहील माणूस?
(पसाराप्रिय) स्वाती