आपण सांगितलेल्या प्रकारातील व्यक्ती मी स्वतः पाहिलेल्या आहेत. पण मी पाहिलेले अनुभव वेगळे आहेत. माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने त्याच्या अमेरिकेतील कंपनीबरोबर एक वर्षाचा करार केला होता. एक वर्ष संपायच्या आत त्याला दुसऱ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती. नवीन कंपनीला त्याने कराराविषयी सांगताच नवीन कंपनीने आपल्या वकिलामार्फत त्या कराराची चौकशी केली. काही कारणाने, तो करार दुतर्फी असून कायदेशीर होता. तेंव्हा नवीन कंपनीने त्या कराराची नुकसानभरपाई जुन्या कंपनीला दिली. तुम्ही तुमच्या नवीन कंपनीला या कराराविषयी कल्पना द्या आणि त्यांच्याशी चर्चा करा.
एकतर्फी कराराला मीही 'वेठबिगारीच' म्हणेन आणि हे बेकायदेशीर आहे.
--ध्रुव.