पराग,

ऑडिओ सीडी नसल्यास वाचनालय चालू शकेल. शिवाय 'ग्रंथालय' हाही शब्द चालण्यास हरकत नसावी. अगदीच ओढून-ताणून वापरायचे असेल तर
'दृक्-श्राव्य ग्रंथालय/संदर्भगृह' म्हणता येईल.

ग्रंथालयासंदर्भात 'इशू' साठी नेहमीच्या वापरातील 'देणे' हा शब्द वापरायला हरकत नाही.

उदा: ते पुस्तक कोणाला 'दिले' आहे. / ते पुस्तक कोणाच्या 'नावावर/खात्यावर लिहिले आहे' ?

पुस्तक कोणत्या तारखेला 'दिले' होते / 'नावावर/खात्यावर लिहिले होते' ?

पुस्तक 'देण्याची' / 'नावावर/खात्यावर लिहिण्याची' तारीख काय आहे ?

दर वेळी मराठी भाषेत प्रत्येक परभाषीय शब्दासाठी प्रतिशब्द मिळेलच असे नाही. तसेच तो शब्द एकाच शब्दात व्यक्त करता येईल असे नाही.

उदाः रिटर्न - परत करणे

रिटर्न डेट साठी २ च शब्द असलेला प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा किंवा बळजबरीने २ शब्दात बसविण्यापेक्षा 'परत करण्याची तारीख' असे लिहिणे योग्य आहे असे वाटते.

तरीही ओढून-ताणून मराठी शब्द वापरण्यामुळे किंवा शब्दांच्या बोजडपणामुळे, तुमच्या-आमच्या सारखे सर्वसामान्य लोक मराठी भाषेपासून दूर पळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रतिशब्द शोधताना-तयार करताना ते सर्वसामान्यांच्या तोंडात सहज बसणारे असावेत असे माझे मत आहे.