ताकापुरते रामायण म्हणजे आपले कार्य साधण्यापुरती दुसऱ्याची खुशामत करणे. यामागची कथा अशी आहे की एक बाई दुसऱ्या बाईकडे ताक मागण्यासाठी गेली तेव्हां ती बाई ताक करत होती. तिचे ताक करण्याचे काम चालले  होते तोपर्यंत पहिलीने तिला खुष करण्यासाठी रामायणाची कथा सांगायला सुरवात केली आणि भांड्यात ताक पडताच कथा घाईघाईने संपवून निघून गेली.
                वैशाली सामंत.