वात्सल्य धड्यात गायीचे नाव चंद्री (तिच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा डाग होता.) आणि तिच्या पाडसाचे नाव हरिणी (तिचे डोळे हरिणीसारखे होते.) होते.

चिमण्यांबद्दल दोन धडे होते. एका धड्यात चिमण्या एका नागाला टोच्या मारून ठार करतात. तर दुसऱ्या धड्यात चिमण्यांनी घरात घरटे बांधू नये म्हणून तिरिमिरीत त्यांचे घरटे जाळून टाकणारा लेखक होता.

आबा हा एक शिंपी होता. आठवड्याच्या बाजारात जाऊन येईपर्यंतचे वर्णन धड्यात होते.

डॉ. पूर्णपात्र्यांची कुत्री (रुपाली?) आकाराने लहान असली तरी सोनालीपेक्षा 'अधिकाराने' मोठे असल्याचे जागोजागी दाखवून देत असे. सोनालीला प्राणीसंग्रहालयात सोडतानाचा प्रसंग वाचताना डोळ्यांत हमखास पाणी तरळत असे.

आताच्या मराठीच्या पुस्तकांत काय आहे या बद्दल कुतूहल आहे.

मलाही.