सर्व सुखरूप असलेल्या मनोगतींची हजेरी येथे अथवा अन्यत्र लागलेली दिसते आहे. पण काहींची अनुपस्थिती उगाचच काळजी निर्माण करते... मन चिंती ते वैरी न चिंती....
मेघदूत, एक वात्रट, बाळू... अशी काही नेहमी दिसणारी मंडळी दिसलेली नाहीत... किंवा माझ्या नजरेतून सुटली आहेत. या आणि अशाच इतरांचीही खुशाली कळली तर सुटकेचा श्वास घेता येईल.
प्रशासकांना मनोगतींच्या emails द्वारा खुशालीची चौकशी करता येणे शक्य आणि योग्य वाटते काय? असाही एक विचार मनात डोकावून जातो. कठीण प्रसंगांसाठी मनोगतींच्या database चा केवळ संपर्कासाठी सुयोग्य उपयोग केल्यास हरकत नसावी.