नमस्कार नीलकांत
मी सुमारे वर्षापूर्वी प्रकाश ओक यांच्या संस्थेमधे दोन आठवड्यांचा बेसिक कोर्स केला होता. मला त्यांची शिकवण्याची पध्दत आणि कोर्सचा अभ्यासक्रम दोन्ही आवडलं होतं आणि हा कोर्स केल्याचा फायदाही झाला होता... आपण शेअर्ससंबंधी कोर्स करण्याचा विचार गांभीर्यानं करत असाल तर त्यांच्याकडे जरूर चौकशी करावी...
त्यांची संस्था डेक्कनवर, डेक्कन जिमखाना क्लबजवळ आहे. फोनः ०२० २५६६३०७६ / ७
याविषयी काही अधिक माहिती हवी असेल तर मला जरून व्य नि पाठवा!
प्रसाद...
जाता जाताः हा कोर्स करण्याचा एक साईड बेनिफिट म्हणजे या संस्थेजवळच पुण्यातलं जगप्रसिध्द आप्पाचं कँटिन आहे जिथे आठवड्यातून तीन दिवस एकमेवाद्वितीय आप्पाची खिचडी मिळते!