तात्या, नाना, चिकू, अंजू, वरूण आणि रोहिणी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तात्या

यावरून एक आठवलं, की मुद्दामून 'समुद्रावरचं आभाळ' बघून पावसाचा अंदाज बांधायची पद्धत अजूनही कोकणातील काही जुन्याजाणत्या कोळी लोकांत आढळते.

मला त्यातलं माहीत नाही पण माझी मावस बहीण मालवणची. समुद्राजवळच वाढलेली त्यामुळे कदाचित तिला समुद्र आणि आकाशाचे रंग पाहून असं भाकीत करता येत असावं की काय कोण जाणे कारण ती मला याच शब्दात सांगत होती की समुद्रावरच आकाश वेगळं आहे, तुम्ही जाऊ नका. आमच्याकडेही ऊन सावलीचा खेळ होता म्हणून ऐकलं नाही आणि फसलो.

वरूण,

आम्ही गेल्या एक वर्षापासून खूपच वादळं अनुभवली आहेत. तुम्ही टेनिसीला राहता असे वाचले. एप्रिल (की मे?) महिन्यात आम्ही केव्ह सिटी (मॅमथ केव्ह) परिसरात असताना टोरनॅडो मधे अडकलो होतो. टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांचा मारा झाला. आम्ही कार मधे होतो पण काचा फोडून गारा आत येतील की काय असं वाटत होतं. तसं काही झालं नाही अर्थात, कार मात्र ठोक्याच भांड झाली.

मुंबईला २६ तारीख उजाडली असल्याने पुढचा लेख आताच घालते आहे.

पुन्हा एकदा आभार.