वृकोदरांच्या मताशी मिळतीजुळती भावना माझीही...
जाणीवपूर्वक केला जाणारा मानभंग आणि उत्साह यांतील फरक लक्षात घ्यायला हवा. अतिउत्साहाला आवर घालायला हवा हे मान्य केले तरीही बऱ्याचदा रोग परवडला पण औषध नको अशी अवस्था होते. बेहोष सही मगर जोष तो है हे अधिक महत्वाचे वाटते.
सचिनला भारतीय तिरंगा स्वतःच्या शिरस्त्राणावर अभिमानाने मिरविण्यास बंदी घातली गेली. असे काहीसे ऐकले आहे. ते खरे असेल तर नक्कीच चुकीचे होते असेही येथे नोंदवितो आहे.