परदेशी,
तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून काही अंदाज आला. तुम्ही भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत आलेला आहात आणि कोणत्यातरी अमेरिकन कंपनीमधेच तुम्हाला नोकरी मिळत आहे.(of course जास्त पगाराची, शिवाय पुढे ग्रीन कार्ड, नागरिकत्त्व खुणावत आहेच!) पण visa भारतीय कंपनीच्या नावावर असल्याने आणि जो काय करार केलाय तो केला असल्याने, तुमच्या मनात भविष्यातील संकटांची धाकधुक आहे!
माझा अंदाज खोटा असेल तर पुढचे वाचू नका, ते तुम्हाला लागू होत नाही.
वरच्या बाबतीमधे तुम्ही कोणत्या visa वर आहात हेही लागू होते. एच-१ वर असाल तर तुम्ही सहज शिफ्ट मारू शकता. माझ्या माहितीप्रमाणे भारतात केलेला करार अमेरिकेत लागू होत नाही. भारतीय कंपनी फारतर तुमच्या घरी, कंपनीतल्या पत्त्यावर, पत्र पाठवेल की हा मनुष्य इतके दिवस गायब आहे. त्याचे दंड म्हणून इतके पैसे भरा! तर घरी सांगून ठेवा की असे कोणतेही पत्र स्वीकारू नका व ह्या मनुष्याची खबरबात आम्हाला नाही, असे रजिस्टरवाल्याला सांगा. अशी पत्रे रेजिस्टर पोस्टानेचे येतात. जर कोणी पत्र स्विकारलेच नाही तर कोणत्याही कायद्यात/न्यायालयात कोणतीही केस उभी राहू शकत नाही.
माझ्या माहितीतल्या "य" लोकांनी अशी नोकरी बदलली आहे आणि आता करोडपती होण्याच्या मार्गावर आहेत. विप्रो, टीसी एस, इन्फोसिस, सत्यम... अशा सगळ्या कंपन्यांमधून लोकं कलटी मारतात. कोणालाही काहीही फरक पडत नाही. अशा मुळे कोणत्या कायदेशीर भानगडीत अडकलेला कोणीही गेल्या ७ वर्षात माझ्या पहाण्यात नाही.
तेंव्हा मी अंदाज केला तीच केस असेल तर खुशाल "गो अहेड". कोणतीही कायदेशीर भीती नाहीये.
नैतिकतेची बूज किती राखायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यासाठी कमी पगाराची कारणेही शोधता येतात. पण दुसऱ्या कुणाचे नुकसान न करता भरपूर पैसा मिळवण्यातही काहीच गैर नाहीये. त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न तुमचा आहे. कायदेशीर बाबीत तुम्ही सेफ आहात.
अजुन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्यक्तीगत संदेश पाठवू शकता.