सध्याच्या युगांत मानवजातीला कुठल्याही प्रचलित वा नव्या धर्माची गरज नसून बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादाची गरज आहे असे वाटते.
स्वातंत्र्य घेणे तसेच इतरांचे हे स्वातंत्र्य मान्य करणे या गोष्टी अभिप्रेत आहेत.
बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादानुसार या जगांत देव, ईश्वर, परमेश्वर, अशी कुठलीही बाह्य शक्ति अस्तित्वांत नाही पण प्रत्येक मनुष्यात अमर्याद सुप्त सामर्थ्य आहे.
या सगळ्याशी १०० % सहमत. प्रखर, वस्तुनिष्ठ, विवेकवादी बुध्दीवाद ही मानवजातीच्या कल्याणाची (प्रगतीची नव्हे! ) गरज.
असे बुद्धीवादी एकत्र येऊन काम करणे हे त्यांच्या उग्र स्वाभीमानामुळे अशक्य हे दुर्दैव.
सत्ताधीशांना आणि राजकारण्यांना या कशाचेच काही देणे घेणे नाही, ही शोकांतिका.