एखाद्या ठिकाणी जे कार्य चालत असेल त्याला सुसंगत असे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कांही गणवेषाचे नियम केले व पाळले जातात ही एक प्रकारची शिस्त असते. त्यात आणि केवळ देवाचे दर्शन घेण्याचे उद्देशाने आलेल्या भक्तजनांवर सोवळ्या ओवळ्याच्या धांकापोटी होणारी जबरदस्ती यांत फरक आहे. देव भावाचा भुकेला असतो. त्याला विटाळ कसा होऊ शकेल?