अप्रतिम अनुभवकथन. वाचून अंगावर काटा आला. त्या रात्री मुंबईच्या माणुसकीचं अनोखं दर्शन घडलं. नेते, पोलिस, संबंधित अधिकारी गायब होते. सामान्य माणसंच मदतीला धावून आली होती. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अंधेरी-जोगेश्वरी भागात मदत करणारे बहुतेक मुसलमान होते. माझी बहिणही बसमध्ये अडकली होती. पाण्याची पातळी वाढली आणि बसमध्ये बसून रहाणं धोक्याचं झालं तेंव्हा बसमधल्या सगळ्या बायकांची रात्रभर रहाण्याची सोय एका मुसलमान घरात करण्यात आली. पहाटे निघताना जेंव्हा माझ्या बहिणीने त्या घरच्या मालकिणीचे आभार मानले तेंव्हा ती म्हणाली,"माफ करा. मी तुमच्यासाठी जेवणाचा बंदोबस्त करू शकले नाही. माझा सहा वर्षांचा मुलगा अजून घरी आला नाही म्हणून मी काही करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. " जात धर्म असा भेदभाव न करता आणि स्वतः संकटात असताना दुसऱ्यांना मदत करणाऱ्यांना सलाम.
                          वैशाली सामंत.