आपल्या बहिणीवर गुदरलेल्या प्रसंगात मुसलमान बांधवांनी दाखविलेले प्रेम वाखाणण्यासारखे आहे.

 नेते, पोलिस, संबंधित अधिकारी गायब होते.

ह्या नकारात्मक वाक्याची पार्श्वभूमी अशी आहे की समस्येचा आवाका इतका भयंकर मोठा होता की नेते, पोलिस आणि संबंधित अधिकारी सर्व ठिकाणी पुरे पडणे शक्यच नव्हते. स्थानिक नेते, पोलिस तसेच नगरपालिकेचे अधिकारी कुठे न् कुठेतरी मदत कार्यात मग्नच होते. एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नमूद करू इच्छितो की, नंतर RTO ऑफिस आठ दिवस बंद होतं. सर्व अधिकारी, पोलीस, कर्मचारी पुर परिस्थितीने उद्भवलेली समस्या निवारण्यासाठी (स्वतःचे घरदार विसरून) मदतकार्यात गुंतलेले होते.
इतर राजकीय पक्षांचे माहीत नाही पण, 'शिवसेना' नगराध्यक्षांनी झालेल्या वैयक्तिक नुकसानाचे परीक्षण करून पीडितानं, अंशतः का होईना, आर्थिक मदतही तत्परतेने केली.

गेल्या वर्षीच्या समस्येतून जनता काय शिकली?
अजूनही कचरा, प्लॅस्टिक, घरातील अडगळ कुठेही टाकली जाते. कचऱ्याने नाले, गटारे भरतात आणि पाण्याचा निचरा होत नाही.
समस्येला सरकार, नगरपालिका अजिबात जबाबदार नाही असे माझे म्हणणे नाही परंतु हीच जनता अजूनही बेजबाबदारपणे  कचरा वाट्टेलतसा, वाट्टेलतिथे फेकते आणि 'आजतक' च्या वार्ताहरांच्या कॅमेरासमोर 'हमलोग कैसेबी जी रहे हय, सरकार कुचबी करती नई' असा गळा काढते. 

असो. विषयाला सोडून झाले का? माफ करा.