प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. राधिका, ४-५ वर्षांपूर्वी १९६० साली प्रकाशित झालेली दोन पुस्तकं वाचनात आली. माहिती अतिशय आवडली म्हणून टिपणं काढून ठेवली होती. त्यावरून लेख लिहीला. कागदी वाघांसाठी माहिती.
तारांबळ उडणे----लग्नाचा मुहुर्त टळू नये म्हणून गुरुजी'ताराबलं चंद्रबलं तदैव' हा श्लोक फार घाईघाईने म्हणून अंतरपाट काढतात. या वरून तारांबळ उडणे म्हणजे गडबड उडणे असा अर्थ होतो.
अनागोंदी कारभार----कर्नाटकात अनागोंदी नावाच्या ठिकाणी विजयनगरच्या गादीची शाखा होती.तिथल्या दरबाराची अशी पद्धत होती की वर्षाच्या शेवटी अमक्या कडून इतकी खंडणी आली, तमक्याकडून तितकी खंडणी आली असे काल्पनिक आकडे जमेच्या बाजूला लिहायचे आणि तितक्याच रकमा त्या त्या व्यक्तींना बहाल केल्या म्हणून खर्चाच्या बाजूला लिहायच्या असे पोकळ जमाखर्च चालत. त्यावरून ज्याला ताळतंत्र नाही ते अनागोंदी.
बादरायण संबंध----मूळ संस्कृत श्लोक असा आहे.
अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः
बादरायणसंबंधात(त पायमोडका) यूयं यूयं वयं वयं
याचा अर्थ असा की आमच्या गाडीचं चाक बोरीच्या लाकडाचं आहे आणि तुमच्या दारी बोरीचं झाड आहे म्हणून तुमचा आमचा संबंध आहे. यावरून बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध.
तचा पाय कसा मोडायचा हे कुणीतरी सांगेल का?
वैशाली सामंत.