शशांकरावांच्या प्रतिसादामुळे पाटणकरांचा एक सुरेख शेर आठवलाः

ऐकुनी माझी शायरी म्हणेल जो आता पुरे,

तो रतिला चुंबिताही म्हणेल, आता पुरे!

(त्यांचा अजून एक शेर आहे, ज्याची शेवटची ओळ आहेः

दुनिया तुला विसरेल (देवा?) न आम्हा विसरेल ती.

-देवा, मी या जगाला काही न देता जात नाहीये, माझी शायरी देऊन जातोय. आणि म्हणून हे जग मला विसरणार नाही- असा काहीसा अर्थ आहे.

कोणाला आठवत असल्यास नक्की लिहा.)