काय सुरेख वर्णन केले आहे. मजा आली वाचताना. प्रत्येक टप्प्यागणिक पुढच्या प्रवसाबद्दलची उत्सुकता वाढीस लागत गेली.
परतीच्या प्रवासातील तो थरारक अनुभव वाचताना धडधड वाढली होती. सुखरूप पोचलात हे वाचल्यावर बरे वाटले. हा अनुभव वाचताना कोकणातून महाबळेश्वरला जातानाचा अनुभव आठविला. मी आणि माझा नवरा अंधार पडल्यावर निर्मनुष्य घाट चढत होतो. रात्रीची वेळ अवघड घाट आणि वर त्या घाटात बरीच लूटमार होते असे ऐकले असल्याने जीव मुठीत धरून कधी एकदा घाट संपतो याची वाट पाहत बसले होते.
पण वेल्ह्याचे प्रकरण काही समजले नाही.खरोखरच वेल्ह्यातून मार्ग नाही की तुम्हाला गावकऱ्यांनी गंडविले ?