प्रियाली,

गेल्या वर्षीची आठवण झाली तुझा लेख वाचून. मी गेल्या वर्षी हे सगळे अनुभवले आहे, त्या आठवणी जाग्या झाल्या. सुदैवाने मी साडेपाच तास गाडी चालवून का होइना पण सांताक्रूझ ते सायन हे अंतर पार करू शकलो आणि हाल टळले. मात्र फक्त अर्धा तास उशीरा निघालो असतो तर घोर प्रसंग ओढवला असता. पुढे दोन दिवस दोन रात्री सायनला आतेबहिणीकडेच होतो. त्या दिवसात अगदी गरीबातील गरीब माणसे आपला घास काढून रस्त्यावर अडकलेल्याना वाढतना दिसली. धारावीतले टपोरी रस्ता दुभाजक फोडून अडकलेल्या वाहनाना परत फिरायला रस्ता करून देत होती व मारग्दर्शन करत होती. एकही पोलीस नसतानाही कुठे सोडून दिलेल्या गाड्या फोडलेल्या दिसल्या नाहीत. अनेक लोकांनी मानवता धर्माला जागून आपल्या घरात त्र्ययस्त पांथस्तांना आसरा व जेवण खाण दिले होते, तेही हसतमुखाने व अगत्याने.

अनेक मुंबईकरांनी अडकलेल्यांना वाचवताना आपले प्राणही अर्पण केले. या महान मुंबईकरांना वंदन.