सुमारे वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एका चाळीत रहात होतो. एका दिवशी गणपतीची वर्गणी मागायला एक मंडळ आणि साधारण गुंडासारखा दिसणारा त्याचा म्होरक्या आला. मी त्याला नम्रपणे सांगीतले की माझा या सगळयावर विश्वास नाही, तेंव्हा मला माफ करा. मी काही वर्गणी देणार नाही. मंडळी मग्रुरपणाने गुरगुरत निघून गेली.
त्याच रात्री चाळीबाहेर लावलेल्या माझ्या दुचाकीवरचे पाचेकशे रुपयांचे कव्हर नाहीसे झाले.