Internet संबंधातः
Website: संकेत स्थळ
लिंक: दुवा
ईंटरनेट: महाजाल
हे बरोबर वाटतात. त्यांचे स्वागत नक्की करावे. पण काही इतर काही शब्द मात्र ओढून ताणून बसवलेले वाटतात. उदाः
क्लिक: टिचकी मारा
क्लिक हा शब्द खरतर आवाज दर्शवणारा आहे. तो तसाच ठेवला तरी काही हरकत नाही असे वाटते. काही इतर शब्दांच्या बाबतीत सुद्धा पर्यायी शब्द मिळतीलच असे वाटत नाही. उदाः
कॉम्प्यूटर: संगणक हा चपखल बसतो. पण "माऊस" साठी "उंदीर" हे अति होईल. "कीबोर्ड" साठी "कळपट्टी" सुद्धा ठीक आहे पण अजूनही जास्त चांगला शब्द शोधता येऊ शकेल असे वाटत.