आपल्याकडे ध्वज आचारसंहितेचे अती खूळ माजवले जाते हे खरे मानले तरी 'आचारसंहिता नकोच. स्वातंत्र्य संपूर्ण हवे' या विधानाशी मी पूर्णतः असहमत आहे. ध्वजाच्या सन्मानालाही काही मर्यादा असावी,त्याचे स्तोम होऊ नये इथपर्यंत ठीक; पण ध्वज हे काही कसेही वापरायचे फडके किंवा बोळा नाही की त्याच्या प्रतिष्ठेसाठी गोळ्या झेलणारे स्वातंत्र्यसैनिक वेडे ठरावेत.
अवधूत.